Pune Dam Water Storage : पुणेकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

Pune Dam Water Storage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, पुणे, कोकण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्याभरात पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा वाढला असून तो ८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.१४ टीएमसी होता.त्यामुळेच पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Pune : धक्कादायक! पुण्यात पालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या दारू पार्टी, १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्या दिवसापासून मागील तीन दिवस पाणलोट क्षेत्रात चारही धरणांमधे १५ मीमी पेक्षाही कमी पाऊस झाला.त्यामुळे पाणीसाठ्यात जास्त वाढ झाली नव्हती.

मात्र, शुकवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. दिवसभरात पानशेत २३ मिमी, वरसगाव २३ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातील पाणीपातळी वाढली आहे. खडकवासला धरणा १ टीएमसी पाणीसाठा आहे तर पानशेत धरणात ३.६४ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. वरसगाव धरणात २.६५ टीएमसी तर टेमघर धरणात ०.७१ टीएमसी पाणीसाठा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply