Pune Dam Water Level: खडकवासला प्रकल्प ९३ टक्के भरले, कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा आकडेवारी

Pune Dam : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणं काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणे शहरावरील पाणीसंकट टळलं असून पुणेकरांचे वर्षभराचे पाणी टेन्शन दूर झाले आहे. पुण्यामध्ये जून महिन्यात चांगला पाऊस झाला नाही. पण जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत गेला. अशामध्ये खडकवासला प्रकल्प ९३ टक्के भरले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्यातील चार ही धरणांमध्ये मिळून ९३.११ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणात सद्यस्थितीत २७.१४ टीएमसी पाणीसाठा जमा आहे. तर पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचे वर्षभरासाठीचे पाणी टेन्शन मिटले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Pune Zika : पुणेकरांचे टेन्शन वाढलं! पुरानंतर झिकाच्या रुग्णात मोठी वाढ, एका दिवसात ७ नव्या रुग्णांची नोंद

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

खडकवासला: ८२.१३ टक्के

पानशेत: ९३.३७ टक्के

वरसगाव: ९२.५९ टक्के

टेमघर: १०० टक्के

पुण्यातील धरणालगतच्या गावांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. खडकवासला धरणालागत असलेल्या गावांना या नव्या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. धरणालगतच्या या ७ ते ८ गावांना आतापर्यंत गढूळ पाणी मिळत होतं. याच गावांसाठी महापालिका १७० MLD क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहे. धरणालगत असणाऱ्या धायरी, नांदेड, नांदोशी, खडकवासला, नऱ्हे या गांवाना याचा मोठा फायदा होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply