Pune Dam : भामा आसखेड धरणात ८२ टक्के पाणीसाठा; धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी

आंबेठाण - खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात ८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ६.७५ टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा ६.२८ टीएमसी इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९३.४० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. तालुक्यातील चासकमान धरणाच्या तुलनेत या वर्षी भामा आसखेड धरणात पाणी साठा खूपच कमी आहे.

Chhatrapati Sambhajinagar : भर बैठकीत राडा! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरेंमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून ४८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे, तरीही शिवे, वहागाव, देशमुखवाडी, आंबोली, वांद्रा, कोळीये, आंभू, पाईट, पाळू, वाघू, तोरणे, आहिरे आदी

भागातून धरणात पाणीसाठा जमा होत आहे. धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता (श्रेणी १) आश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply