Pune Cyber Crime : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख पडली महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाख रुपयांत फसवणूक

Pune Cyber Crime : संगणक अभियंता तरुणीने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर तिची ओळख एका तरुणाशी झाली. दोघांची बोलणे होत असताना तरुणाने सदरच्या तरुणीला विवाह करण्याचा शब्द दिला. मात्र या तरुणाने नवीन व्यवसाय करण्याचे सांगीतले. तसेच परदेशी चालनाबाबत चौकशी होत असल्याचे सांगून तरुणीकडे पैशांची मागणी करत तब्बल ४० लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पुण्यातील तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. या संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली. मी परदेशात एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहे असं या शर्मा नावाच्या व्यक्तीने तिला बतावणी केली. शर्माने विवाहास होकार दिल्यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क वाढला. यात त्याने लवकरच भारतात येऊन व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले. यासह त्याने एक बनावट विमान प्रवासाचे तिकिट देखील तिला पाठविले.

Maharashtra Election : महायुतीतील जागावाटप दोन-तीन दिवसात मार्गी लागेल; खासदार श्रीकांत शिंदे

दरम्यान दिल्ली विमानतळावर आलोय, पण परदेशी चलनाबाबत माझी चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने या तरुणीला फोन करून सांगितलं. काही शुल्क या ठिकाणी असलेल्यांना द्यावा लागेल असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरित पैसे जमा करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन या तरुणीने त्याच्या बँक खात्यात ४० लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाइल बंद केला. तरुणीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु होऊ शकला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply