Pune Crime : जीवे मारण्याच्या उद्देशाने, दुचाकीस मोटारीची धडक; पुणे- पानशेत रस्त्यावर नांदेड गावाच्या हद्दीतील घटना

खडकवासला : जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीस मोटारीने जाणूनबुजून धडक दिल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पानशेत रस्त्यावर नांदेडच्या हद्दीत घटना घडली.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शिवम उर्फ चिक्या अनंत बरीदे (वय २३, रा.खडकवासला) हा त्याचे मोटार सायकलने नऱ्हाकडे जात होता. त्यावेळी अजय नेटकेने पाठीमागून मोटारीने येऊन धडक दिली.

Pune : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी, चिक्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. मोटरसायकलला पाठीमागून मुद्दाम धडक देऊन खाली पाडले. त्यास जखमी केले. त्यावेळी चिक्या बरीदे याने अजय नेटके व त्याच्या तीन साथीदारांना ओळखले.

त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मुद्दाम धडक दिली. त्यास पाडले दुखापत केली. हे लक्षात येताच चिक्याने तात्काळ डायल ११२ यावर कॉल करून पोलीस मदत मागितली. हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत शिंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहून अजय संतोष नेटके व त्याचे 3 साथीदार व त्या ठिकाणाहून वाहन सोडून पळून गेले.

हवालदार शिंदे यांनी चिक्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यास मारणार्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यास आज जखमी केल्याचे चिक्याने सांगितले. हवालदार शिंदे यांनी धडक देणाऱ्या मोटारीची पाहणी केली असता, मोटारीतील मागील सीटवर पोत्यामध्ये चार धारदार कोयते आढळले.

त्यानंतर शिंदे यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांना माहिती दिली. पोलिस वांगडे व अन्य अधिकारी कर्मचारी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्हयातील आरोपींचा उद्देश व गांभीर्य लक्षात घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे सचिन वांगडे यांनी आरोपींचा शोध सुरु केला.

यासाठी अन्य अधिकारी व पोलीस अंमलदार यांची तात्काळ दोन तपास पथके तयार करून वर नमूद आरोपींचा संपूर्ण रात्रभर शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे. अन्वये आरोपी नामे अजय नेटके, व इतर तीन विधी संघर्ष ग्रस्त बालक यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हयातील आरोपींचा रात्री कोंबिंग ऑपरेशन करून शोध घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply