Pune Crime News : जीएसटी कार्यालयातील महिला अधिकारी लाच घेताना ताब्यात

Pune Crime News : वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) महिला अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली आहे. मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची मिटणार? महापालिकेच्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता.

त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले होते. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply