Pune Crime News : मोबाईल चोरल्याच्या संशय; तरुणांनी थेट महिलेवर गोळ्या झाडल्या

Pune Crime News : पुण्यात सलग चौथ्या दिवशी खुनाचे सत्र सुरूच आहे.  मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी महिलेचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.  वर्षा थोरात असे खून  झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी आरोपींचे नाव आहे.  पुण्यात खुनाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्याव्यसाय करतो. 10 – 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़ हा मोबाईल थोरात ने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने व गौरव यांनी थोरात बाई कडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली पडली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply