Pune Crime News : डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; कात्रज चौक परिसरात नागरिकांमध्ये घबराट

Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कात्रज चौक परिसरात डोक्यात दगड घालून एकाच खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. अज्ञातांनी अतिशय निर्घृणपणे व्यक्तीची हत्या केलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलंय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सकाळी नागरीक या रस्त्याने जात असताना एका व्यक्तीची नजर रस्त्याच्या कडेला पडली. त्यावेळी एका व्यक्तीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह तेथे अढळून आला. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणासाठी पालिका लागली कामाला; सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी

घटना पाहण्यासाठी येथे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपासात या व्यक्तीचे नाव मनोहर बागल असल्याचे समजले आहे. मनोहर यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलीये. त्यांच्या हत्ये मागचं कारणं काय हे अद्याप समजू शकलेलं नाही. सदर घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील घडामोडी थांबता थांबत नाहीयेत. तसेच कात्रज चौक परिसर तर आता खास गुन्हेगारीच्या घटनांसाठी ओळखला जातोय. पुण्यात कात्रज परिसरात आंबेगाव बुद्रुक येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट स्कॉच कारखान्यावर छापा टाकला आहे. विदेशी स्कॉचच्या एकूण ३४ सीलंबद बाटल्या, दोन दुचाकी आणि ५५१ रिकाम्या बॉटल्स इतर साहित्य मिळून एकूण १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

विदेशी बनावटीच्या मद्याच्या वापरलेल्या रिकाम्या बाटल्यांमधून पुन्हा भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलमधून मुंबई आणि इतर शहरात पाठवले जाात होते. तर दुचाकीच्या मदतीने त्याची पुण्यात विक्री केली जात होती. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. तर अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply