Pune Crime News : डॉक्टरचा 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरुन झालेल्या ओळखीतून एका डॉक्टरने महाविद्यालयीन तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

डॉ. शुभंकर महापुरे (वय २६ वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सोशल मीडियावरुन तिची डॉ. शुभंकर याच्यासोबत ओळख झाली होती.

Solapur-Tuljapur Highway: तुळजापूर-सोलापूर महामार्ग तब्बल ३ दिवस राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

आरोपीने पीडितेला वारंवार मॅसेज करुन तिच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिला २४ सप्टेंबर रोजी आपल्या क्लिनिकमध्ये बोलावून घेतलं. तिथे आरोपीने तिला जबदस्तीने दारु पाजली. रात्रीच्या जेवणानंतर पीडितेला गुंगी आली.

याच संधीचा फायदा घेत आरोपीने २० वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तरुणीने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *