Pune Crime : मुळशीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीची 57 लाखांची दारु जप्त

Pune : राज्य उत्पादन शुल्कच्या वतीने मुळशी तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे माणगाव हायवे रोडवर धडक कारवाई करत तब्बल ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांच बेकायदेशीर मद्य जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दानाराम नेहरा आणि रुखमनाराम गोदरा या दोन जणांना अटक केली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्री करीता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने मोहिम राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे माणगाव हायवे रोडवर संशयित ट्रक वाहानाची चौकशी करीत असताना एक सहा चाकी ट्रक थांबवून वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली.

वाहन चालकाने त्यामध्ये औषधे व इंजक्शन असल्याचे सांगितले परंतू त्याने संशयितरीत्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजुस घेऊन तपासणी केली असता बेकायदेशीर मद्य आढळून आलं. वाहन चालकाकडे मद्य वास्तुकेचे संदर्भातील कोणताही वाहतुक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यांच्यांकडून 57 लाखाचा मुद्देमाल व मद्य जप्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply