Pune Crime News : पत्नी आणि पुतण्याची हत्या करत सहाय्यक पोलीस आयुक्ताने संपवलं जीवन; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News : पुणे शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर देखील गोळी झाडत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.

पोलीस आयुक्त भारत गायकवाड , पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भरत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि पुतण्याचा खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भरत यांनी नेमकी ही हत्या का केली? त्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Mumbai-Pune Expressway Landslide: मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळली; पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या 2 लेन बंद

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply