Crime News : अंगावर चिखल उडाला म्हणून वाद; दहा ते बारा जणांनी कोयत्यांनी केली वाहनांची तोडफोड

सिंहगड - अंगावर चिखल उडाला म्हणून झालेल्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळीने डोणजे येथे रात्रीच्या वेळी येऊन एक दुचाकी व एका कारची कोयत्यांनी तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे.इजाज मुनीर शेख (वय 21, रा. डोणजे, ता. हवेली) या तरुणाने याबाबत हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार शिवप्रसाद उर्फ मन्या किसन चोरघे(अंदाजे वय 22 वर्ष) याच्यासह त्याच्या दहा ते बारा अज्ञात साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी धायरी परिसरातील आहेत.

फिर्यादी इजाज हा डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना(दि.16) सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली.

स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी (दि. 17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधून, हातात मोठमोठे कोयते घेऊन दहा ते बारा जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एक स्विफ्ट कार व बुलेट मोटारसायकलची तोडफोड केली.

Hatnur Dam : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलीसांनी विश्वास दिल्यानंतर इजाज शेख याने तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश धनवे याबाबत अधिक तपास करत आहेत.

'कोयता गँगचे प्रकार आमच्या भागात खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही सर्व पीडितांना विनंती करतो की अशा टोळ्यांची माहिती द्या जेणेकरून त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.'

- अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply