Pune Crime : कोयता फिरवत दहशत; पोलिसांनी तासाभरात मोडला तरुणांचा माज, गावभर धिंडफेरी

Pune : पुण्यातील धायरी गावात गाडीच्या बोनेटवर कोयता दाखवून दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी वरात काढली. जिथे कोयता घेऊन दहशत केली, तिथे जाऊन पोलिसांनी आरोपींची वरात काढली. पुण्यातील धायरी गावात हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पुण्यातील धायरी गावात तरुणांनी दहशत माजवली होती. प्रथमेश देविदास बनसोडे (वय २३), आभिद महेश गुरव(वय २५), आदेश बाळू वाळके (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी गावातील काही नागरिकांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तक्रार केली की, पवळी चौकात एक तरुण कारच्या बोनेटवर चढून हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हत्यारांचा धाक दाखवत आहे. तसेच त्याचे दोन साथीदार शिवीगाळ करून दहशत माजवत आहेत.

नागरिकांच्या तक्रारीनंतर नांदेड पोलिस ठाण्यातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यावर या तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या ठिकाणी या तरुणांनी दहशत माजवली, तिथे जाऊन त्यांची धिंड काढली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *