Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार

Pune : पुण्यामध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गाडीला कट लागल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर आरोपीने हवेत गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारामुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण होते. या गोळीबारात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. याप्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोघांनी हवेत गोळीबार केला. मध्यरात्री गोळीबाराचा आवज ऐकून बिबवेवाडीमधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते. फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला.

Pune : किल्ला चढताना छातीत तीव्र वेदना, पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा सिंहगडावर हार्ट ॲटॅकनं मृत्यू

गोळीबार करत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळीबारात कुणीही जखमी नाही. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबार करणाऱ्या २ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश भालके आणि देवा डोलारे असे गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर चार आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply