Pune Crime : गुंडगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा दणका; मारहाण केल्यानं गेली नोकरी

Pune : गुंडगिरी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस वरिष्ठांनी मोठी कारवाई केलीय. लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करत त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पुण्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या शहराला आता गुन्हेगारीचं शहर म्हणून ओळख मिळू लागलीय. अत्याचार, कोयता हल्ला, वाहन जाळपोळीच्या घटना, चोरी, घरफोडी अशा घटनांच्या बातम्या वारंवार येत आहेत.

पुण्यातील पोलीस यंत्रणा येथील गुन्हेगारी कमी करण्यात अपयशी ठरत आहे, त्यात पुण्यातील पोलीस कर्मचारीच मारहण करत असल्याची बाब समोर आल्यानं सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलायं. विजय जाधव असे मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Pune Swargate : अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई; स्वारगेट बस डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

विजय जाधव यांच्यासह, त्याचा भाऊ आणि बहीण यांच्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आमच्या बाजूने पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत म्हणून विजय जाधव याने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. तक्रार घेतली नाही म्हणून पोलीस ठाण्यात पोलिस शिपायाने जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. बेशिस्त, बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याचे काम पोलीसच करत असतात, तेच पोलीस सामान्य जनतेचे लचके तोडत असल्याची घटना पुण्यातील विश्रांतवाडीत घडलीय. विश्रांतवाडीतील आर कंपनी, पोलीस मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लोखंडी रॉड, लाकडी दांडके, घेऊन एकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गु्ंडगिरी करणाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, विजय जाधव हे आर कंपनी, पोलीस मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्यासह त्यांचा भाऊ विकी जाधव, बहिण आणि बहिणीचे पती आणि इतर ०२ सहकारी यांचेसोबत संगनमत करुन बेकायदेशीर जमाव जमवला. हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन मारहाण केल्याची तक्रार ओंकारसिंग गुलचंदसिंग भौड यांनी दिली होती. याचप्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply