Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ

Pune : पुण्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भुकूममध्ये एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनाची नोट आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसात तक्रर दाखल करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू करण्यात आलाय.

पुण्याजवळील भुकूममध्ये एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्यामुळे खळबळ उडाली. लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनातील नोट सापडली. याबाबत सोसायटीचे चेअरमन यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे.

Dhule Crime : बसच्या पुढे कार आडवी लावली, वाहनाला कट का मारला? जाब विचारत चालकाला बसमध्ये घुसून मारहाण

सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनाची नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने बावधन येथील पोलिसांना संपर्क करून चौकशीसाठी अर्ज दिला. पोलिसांनी या बाबतचा तपास सखोल करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलयं. पोलिसांकडून याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानी चलनाची नोट पुण्यात कशी आली? ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली? ती आपल्या देशामध्ये कोणाकडून आली? तिचा वापर कोण करत होते? पाकिस्तानमधून भारतामध्ये या नोटा कोण घेऊन आले? या सगळ्या गोष्टींचा तपास बावधन पोलीस करत आहेत. पाकिस्तानी चलनाची नोट आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस- 3 या सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट आढळली या प्रकरणी बावधन पोलिसात तक्रार दाखल. याबाबत सोसायटी चे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply