Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

Pune : लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोळसे गल्लीतील एका दुकानात कारवाई करुन त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे ७७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हुसेन नुर खान (वय २१) , फैजान अयाज शेख (वय २२, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फैजान याचे महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्लीत कुलूप विक्रीचे दुकान आहे. शहरात छुप्या पद्धतीने मेफेड्रोनची तस्करी आणि विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागातून पोलिसांनी २३ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !

कोळसे गल्लीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचा साठा करुन ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विशाल दळवी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून फैजान आणि हुसेन यांना पकडले. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस कर्मचारी संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी ही कामगिरी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply