Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Pune Crime : पुण्यात सलग चौथ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. पन्नास वर्षीय नराधमाने छत्तीस वर्षे महिलेवर घरात घुसून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

वारजे माळवाडी परिसरामध्ये एका सोसायटीतील ३६ वर्षे महिला आपल्या घरात भांडी घासत होती. त्यावेळी पन्नास वर्षीय आरोपीने घरात घुसून आई कुठे आहे? आई कुठे आहे? असा आवाज देत पीडित महिलेला खाली पाडत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्यामुळे पीडित महिला अत्यंत घाबरली होती. घाबरलेल्या पिडीतेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका घेतली.

Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पिडीत महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (Pune Crime News) झालीय. आज सलग चौथ्या दिवशी महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply