Pune : घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये शनिवारी रात्री पूर्ववैमस्यातून दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीत एका गटाकडून पिस्तुलातून गोळीबार, तसेच तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील आठ जणांना ताब्यात घेतले असून, त्याांच्याकडून गज, कोयता. एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
रोहित उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले (वय २२, रा. सांबरेवाडी, सिंहगड ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हाणामारीत सोमनाथ अनंत वाघ ( वय २४, रा. सांबरेवाडी ) गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आल्या आहेत. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न व सशस्त्र मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मंगेश उर्फ मुन्ना मोहन दारवटकर (वय २५, रा. कोंडगाव, ता. हवेली), वैभव उर्फ सोन्या शिवाजी जागडे (वय २०), सिद्धेश राजेंद्र पासलकर (वय २५, दोघे रा. आंबेड, ता. वेल्हा), प्रथमेश उर्फ भावड्या मारुती जावळकर (वय १८), सुमीत उर्फ दाद्या किरण सपकाळ (वय २०), केतन उर्फ दाद्या नारायण जावळकर (वय २३), वैभव किशोर पवार (वय १८), तेजस चंद्रकांत वाघ (वय २४, सर्व रा. खानापूर, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.
Pune : ससून रुग्णालयात सर्वात मोठा घोटाळा; कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये, २३ जणांविरोधात गुन्हा |
घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये वर्चस्वातून तेजस वाघ आणि रोहित ढिले यांच्यात वाद सुुरू होते. शनिवारी रात्री रोहित आणि तेजस यांच्यात वाद झाला. रोहितने तेजसला जिवे मारण्याची धमकी देऊन खानापूर चौकात बोलावले. तेजस त्याचे मित्र मंगेश दारवटकर, वैभव जागडे, संग्राम वाघ, सिद्धेश पासलकर, स्वप्निल चव्हाण, केतन जावळकर, गणेश जावळकर, प्रथमेश जावळकर, सोमनाथ वाघ, आकाश वाघ, सुमीत सपकाळ, वैभव पवार यांना घेऊन खानापूर चौकात आला. आरोपींनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. राेहित याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात रोहित याचा मृत्यू झाला, असे ओंकार धमेंद्र ढिले याने हवेली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गोळीबारात सोमनाथ वाघ जखमी झाला असून, त्याचा मामा सुरेश दशरथ तागुंदे याने हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. रोहितने तेजसला धमकी देऊन खानापूर चौकात बाेलावले. रोहित, त्याचे मित्र यश जावळकर, विकास नारगे, साहिल कोंडके, चेतन जावळकर, प्रवीण सांबारे यांनी सोमनाथ आणि त्याचा भाऊ तेजस यांना मारहाण केली. आरोपींनी सोमनाथवर पिस्तुलातून गोळीबार केल्याने तो गंभीर जखमी, असे तागुंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाल्यामुळे सांबारेवाडीत तणाव निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
शहर
- Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत राहणार सुरू
- Navi Mumbai : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून वाहतुकीत मोठा बदल, पुढील २५ दिवस रस्त्याचे काम चालणार
- Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर
- Pune : मारहाण केल्याप्रकरणी बाबुराव चांदेरेंवर गुन्हा दाखल; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
महाराष्ट्र
- Sangli News : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, 35 प्रवासी जखमी
- Chandrapur : वाघांच्या शिकारीतील बहेलिया टोळीचा म्होरक्याला अटक; राजुरा तालुक्यातून घेतले ताब्यात
- Bhandara : भंडाऱ्याच्या सनफ्लॅग कारखान्यात पुन्हा अपघात; दोघ अप्रशिक्षित कामगार गंभीर
- Solapur News : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याने मारहाण करत जबरदस्ती शेतजमीन केली खरेदी; शेतकऱ्याच्या आरोपाने खळबळ
गुन्हा
- Baramati : निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना
- Pune Crime : आधी मुलाला मारलं नंतर पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं!
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Mahakumbh cylinder blast : महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी
- Naxal Encounter : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं
- Goa paragliding accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात, पुण्यातील तरूणीसह पायलटचा मृत्यू
- Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय