Pune Crime News : दांपत्याने चोरलेली १७ वाहने जप्त

Pune Crime News :  शहर, परिसरातून दुचाकी तसेच मोटारी चोरणाऱ्या दांपत्याला सिंहगड रस्ता पोलिसानी अटक केली आहे त्याच्याकडून १२ लाख ७० हजार रुपयांची १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनामा आध मोटारी आणि नऊ दुचाकींचा समावेश आहे. सासवड रस्त्यावरील वडकीनाला परिसरातून या दोघाना अटक करण्यात आली आहे.

शाहरुख राजू पठाण (वय २४) आणि आयशा शाहरुख पठाण ऊर्फ पूजा जयदेव मदनाल (वय २१, दोध रा. कुजीरवाडी, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पठाण दांपत्याने वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क, सिंहगड रस्ता आणि हडपसर भागातून वाहने चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूची वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. सिंहगड रस्ता परिसरातून वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सिंहगड रस्ता पोलिसांकडून गेल्या दोन महिन्यापासून तपास सुरू होता. तपासात पोलिसांना चोरटे सासवड रस्त्यावरील वडकी नाला परिसरात थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पठाण दांपत्याला पकडले.

पठाण दांपत्य पुण्यातून वाहने चोरून नागपूर आणि शिर्डी परिसरात विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, साहाय्यक निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक सतोष भाडवलकर उत्तम तारू, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *