Pune : 'आम्ही वस्तीतील भाई' म्हणत तरुणांकडून परिसरात दहशत; दगड, विटांनी वाहनांची केली तोडफोड, CCTV समोर

Pune : पुण्यामध्ये आम्ही या वस्तीतले भाई आहोत, असं म्हणत तरुणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरात दहशत निर्माण करत अनेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. हातात दगड, विटा, पेव्हर ब्लॉक करत वाहनांचे नुकसान केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कपिल तांदळे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, १० जून रोजी कपिल तांदळे हे त्यांची ऑटो रिक्षाचे शिफ्ट बंद करून राहत्या घरी येत होते. तेव्हा कपिल तांदळे रामटेकडी हडपसर येथे आले असता त्यांच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी त्यांना अडवलं. त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कम त्यांनी जबरदस्तीने काढून घेतली.

Pune : पोलीस रडारवर; चिरीमिरी घेताना आढळल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार, पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

यावेळी तक्रारदार कपिल तांदळे यांनी प्रतिकार केला. तेव्हा रागाच्या भरात या तरूणांनी त्यांच्या तोंडावर दगड मारून त्यांना जखमी केलं. कपिल तांदळे आरोपींना तेथून पोलीस स्टेशनला जातो, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्या भागात असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांवर दगड, विटा मारून तोडफोड करून मोठं नुकसान केलं आहे.

यावरच न थांबता आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांनी 'आम्ही या वस्तीतले भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, कोण मध्ये आले तर त्यांची विकेट पाडू, एक एकाला जीवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी आता या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये, रोज नवीन नवीन घटना समोर येत आहे. नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण दिसत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply