Pune Crime News : वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

Pune Crime News : वानवडीमधील महंमदवाडीत असलेल्या सराफी पेढीवर शनिवारी सकाळी दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले आहेत. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी चेहरे रुमालाने झाकल्याचे दिसून आले आहे.

महंमदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात असलेल्या बी. जी. एस. ज्वेलर्स सराफी पेढीत हा प्रकार घडला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. त्यानंतर त्यांनी सराफी पेढीचे मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखविला. जीवे मारण्याची धमकी देऊन सराफी पेढीतील दागिन्यांची लूट करून चोरटे पसार झाले.

Pandharpur News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश तपास पथकाला दिली. चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply