Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; चौकातील लाईट बंद करून वाहनांची तोडफोड

Pune Crime News : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे. हातात कोयते घेऊन काही मुलांनी गाड्यांची तोडफोड केलीये. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अप्पर परिसरात धुडगूस घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील बेबेवाडी सुपर परिसरात काल रात्री 11च्या सुमारास 10 ते 15 गुंडानी 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे नुकसान केलेय. तोडफोड करत त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. वारंवार असे प्रकार घडत असून, पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

CM केजरीवाल यांच्यासाठी तिहार तुरुंगात स्थापन केला मेडिकल बोर्ड; एम्सचे 5 डॉक्टर करणार तपासणी

पुणे शहरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे. परंतु पुणे पोलिसांना कोयत्याची दहशत मोडीत काढण्यास अपयश येत आहे. अप्पर परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. जे नागरिक या सर्व प्रकाराचा पाठपुरावाककरून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे व्हिडिओ पोलिसांकडून डिलीट केले जातात, असा दावा नागरिकांनी केलाय.

गेल्या वर्षापासून पुण्यामध्ये कोयता गँगने मोठी दहशत माजवली आहे. पोलिसांकडून या गँगमधील मुलांना पकडण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत पोलिसांनी कोयता गँगमधील अनेकांना अटक केली आहे. गेल्याच महिन्यात कोयता गँगच्या म्होरक्याची हत्या झाली. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय.

इंदापूरमध्ये कोयता गँगचा म्होरक्या असलेला अविनाश धनवेची कोयत्यानेच हत्या करण्यात आली. अविनाश आळंदीमध्ये कोयता गँगचा म्होरक्या होता. सदर घटनेनंतर अविनाशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

गोऱ्हे बुद्रूक परिसरात कोयता गँगची दहशत

या आधी पुण्याच्या गोऱ्हे बुद्रूक परिसरात देखील कोयता गँगने मोठी दहशत पसरवली होती. कोयता गँगमधील ४ ते ५ जणांनी तीन जणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. दहशत पसरवण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply