Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

Pune Crime News : पुण्यात वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींच्या ताब्यातून साडेसहा लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. 

चतुःशृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अटक केलेल्यांमध्ये कन्हैया दत्तप्रसाद पवार (वय १९, रा. कळमकर चौक, बाणेर रस्ता), किशन राजेश राम (वय २०, रा. वाकड) आणि चंद्रकांत रामा पटेकर (वय २४, रा. थेरगाव) यांचा समावेश आहे. या आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Rohit Pawar And Crab : 'त्या' खेकड्याचं नेमकं काय केलं? रोहित पवारांनी स्पष्टीकरण देताना भाजपला धरलं धारेवर

शहरातील वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. चतु:शृंगी पोलिसांचे तपास पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींचा शोध घेत होते. त्यातून हे गुन्हेगार सापडल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *