
Pune : स्वारगेट आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढत आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या वादातून वारंवार हल्ले आणि फायरिंगच्या घटना घडत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे स्वारगेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नव्याने उदयास येत असलेल्या या टोळ्यांना आताच जरब बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनीच भर रस्त्यात फायरिंग करून धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती. त्याच घटनेचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी (६ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा गोळीबार करण्यात आला. यात मोझेस मल्लिकार्जुन शेकापुरे (रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्या पाठीत गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोझेस शेकापुरे, त्याचा भाऊ सागर शेकापुरे आणि त्यांचा मित्र निखिल लगाडे हे महर्षीनगर येथे शिवजयंती उत्सव पाहून दुचाकीवरून घरी जात होते. रात्री ११.२० ते ११.३० च्या दरम्यान वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक रोडवरील बन्सीलाल नेमीचंद ओस्तवाल यांच्या दुकानासमोर काही आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोझेस जखमी झाला, तर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाले.
या प्रकरणी सागर शेकापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी आणि जखमी दोघेही स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांतच दोन वेळा फायरिंगच्या घटना घडल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. काही महिन्यांपूर्वीही सराईत गुन्हेगारावर हल्ला झाला होता. त्या वेळीही हल्ल्यासाठी पिस्तूल बाहेर काढले होते. मात्र, त्यातून गोळी न सुटल्याने मोठा अनर्थ टळला होता. सीसीटीव्हीमध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसत असतानाही, पोलिसांनी पिस्तुलाचा वापर रेकॉर्डवर घेतला नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
शहर
- Pune : पुणेकरांना दिलासा! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
- Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली
- Pune : कोथरूड मधील केळेवाडीतल्या मालन शिंदेंचा आरोग्याकडे परतलेला विश्वास; मोबाईल मेडिकल युनिटमुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण
- Mumbai Metro : ‘लास्ट माईल’ सेवेवर प्रवाशांची पाठ; मेट्रो-३च्या अनेक स्थानकांवरील बस सेवा बंद
महाराष्ट्र
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Nashik : एक कोटीची डील; पहिला हप्ता 20 लाखाचा, नाशिकचा GST अधिकारी मुंबई ACBच्या जाळ्यात
- Pune : पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत देहविक्रयात अडकल्या; चार महिलांची सुटका!
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी





























Subscribe to my channel

