पुणे : नोकरदार महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांना त्रास देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येत आहे. शहराच्या वेगवेगळय़ा भागांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी सांगितले. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी समाजमाध्यमातून (ट्विटर लाइव्ह) पुणेकरांशी संवाद साधला. या चर्चेत सहभागी झालेल्या नागरिकांनी महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलींची सुरक्षा तसेच शहरातील वाहतूक समस्येबाबत प्रश्न उपस्थित केले. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलीस आयुक्तांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. एका सर्वेक्षणानुसार महिलांच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा पाचवा क्रमांक आहे. शहरात महिलांच्या दृष्टीने अधिक सुरक्षित वातावरण कसे राहील, यादृष्टीने पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत का? असा प्रश्न रमेश पाश्र्वनाथ यांनी उपस्थित केला. महिलांच्या दृष्टीने पुणे देशात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. सुरक्षित शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक वाढवा, यादृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नोकरदार महिलांसाठी बडी कॉप, विद्यार्थ्यांसाठी पोलीस काका, पोलीस दीदी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे पोलीस उपायुक्त गुप्ता यांनी सांगितले. एखाद्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यास त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांच्याशी संवाद साधून समस्या सोडविण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले. शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेतील पथकांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी तसेच समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास समस्या सुटेल तसेच वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. मोटारीवरील दिखाऊ पाटय़ांवर कारवाई काहीजण मोटारीवर पोलीस, आर्मी, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन असा नामोल्लेख असलेल्या पाटय़ांचा वापर करत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केली. मोटारीवर अशा प्रकारच्या पाटय़ांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


