
Pune : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसही चक्रावून गेले असताना ड्रेनेजलाइन दुरुस्तीच्या नावाखाली एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला सहा कोटी ७० लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली असून, संदीप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी, शर्मा, राउत, महाजन तसेच बँक मॅनेजर व न्यायाधीश असल्याची बतावणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अतिरिक्त संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या आईच्या नावे पुण्यातील नवी पेठेत भाड्याने दिलेले घर आहे. भाडेकरूने ड्रेनेज तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीशी बोलण्यास सांगितल्यानंतर, संदीप चव्हाण नावाच्या व्यक्तीने आपण महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याचा प्रस्ताव दिला. प्रारंभी ६५ हजार रुपये खर्च सांगून तक्रारदारांकडून ऑनलाइन रक्कम घेतली. त्यानंतर जून २०२५ पर्यंत तक्रारदारांकडून एकूण तब्बल सहा कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसांत विविध मार्गांनी, सरकारी अधिकारी, न्यायाधीश, पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अटकेची किंवा गंभीर कारवाईची भीती दाखवली जात असल्याने नागरिक घाबरतात आणि सायबर चोरट्यांच्या दबावाला बळी पडतात आणि ते म्हणतील त्या पद्धतीने पैसे देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक होऊन पैशांचा अपहार होत आहे. या प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे.
मशिन डिपॉझिट, महापालिका चलन, विविध विभागांचे शुल्क आदी कारणे देऊन आरोपींनी वारंवार पैसे उकळले. पैसे परत मिळतील अशी खोटी आश्वासने देऊन, बँक अधिकारी, पोलिस, न्यायाधीश असल्याची बतावणी करून धमकावणे आणि भावनिक दबाव टाकणे सुरू ठेवले. मुलाचे ऑपरेशन, मृत्यू, न्यायालयीन खर्च आदी खोट्या कारणांनी तक्रारदारांकडून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करून घेतले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

