
Pimpri-Chinchwad : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेकदा गुन्हेगारी घटना समोर येताना दिसत आहेत. आता तर अतिशय क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. संबंधित घटना ही पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक तरुणांमध्ये आता रागावर कोणतंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. थोडाही संयम त्यांच्यात दिसत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. कारण तशी घटनाच पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मरेकऱ्याला अटकदेखील केली आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. सर्वसामान्य नागरिकाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सनी चव्हाण या आरोपीला अटक केली आहे. संतोष पवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
|
|
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि सनी चव्हाण हे दोघेही सोमाटणे फाटा परिसरात जुन्या पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानात मुलं खेळत असलेला क्रिकेट सामना पाहत बसले होते. दोघेही एकाच कट्ट्यावर बसले होते. विशेष म्हणजे, हे दोघे एकमेकांना ओळखत नव्हते आणि पूर्णपणे अनोळखी होते.
दरम्यान, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान मयत संतोष पवार याने आरोपी सनी चव्हाणला आईवरून शिवीगाळ केल्याने चव्हाण संतप्त झाला. रागाच्या भरात सनी चव्हाणने तिथेच असलेल्या दगडाने संतोष पवारच्या डोक्यावर जोरदार घाव घालून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सनी चव्हाणला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
संतोष पवार यांच्या हत्येमागे ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसून, केवळ आईवरून शिवी दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह सवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune Crime : तळेगावात आईवरून शिवी दिल्याच्या रागातून तरुणाचं धक्कादायक कृत्य; पुणे हादरलं”