Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत! रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण; धक्कादायक VIDEO व्हायरल

Pune : पुणे नाशिक महामार्गावर गुंडगिरीचा थरार पाहायला मिळाला आहे. घाटात गाडी आडवी लावून बसमध्ये घुसत ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी लवकरात लवकर या गाव गुंडांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर खेड ते मंचर दरम्यान एसटी बस धावत होती. यादरम्यान काही तरुणांच्या थार गाडीने या बसचा रस्ता अडवला. गाडी बसच्या समोर आडवी लावून गाडीतील तरुण एसटीमध्ये घुसले. यानंतर चालकाने बस चालू केली असतात या तरुणांनी चालकालाच चालू बसमध्ये मारहाण केली.

Pune : गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; दुसऱ्या व्यक्तीस लग्नाची गळ घालत गुन्ह्याची धमकी

या मारहाणीदरम्यान प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मारहाण सुरु असताना प्रवाशांपैकी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने मारहाण थांबवण्यास सांगितली. मात्र त्यांच्या विंनतीला न घाबरता या गुंडांनी चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असं म्हटलं जात आहे.

या तरुणांनी फक्त बस चालकाला मारहाण न करता कंडक्टरवर देखील हल्ला केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पण ही गुंडगिरी प्रवाशांमध्ये दहशत पसरवत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून, पोलिस कारवाईची मागणी जोर धरत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *