Pune : गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; दुसऱ्या व्यक्तीस लग्नाची गळ घालत गुन्ह्याची धमकी

Pune : 'माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर दोन लाख रुपये दे; अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते,' अशी धमकी देत एका महिलेने दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने यापूर्वीही उच्च न्यायालयात वकील असल्याचे भासवून एका ४७ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या व्यक्तीला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तिने अत्याचार केले होते, असा पीडित पुरुषाचा आरोप आहे.

हा प्रकार घोरपडी येथील बी.टी. कवडे रस्ता परिसरात १५ सप्टेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत घडला. मुंढवा येथील ३७ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार या कोथरुडमधील ३८ वर्षीय महिलेविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

IndiGo Flight : मुंबई–दिल्ली आणि मुंबई–पुणे विमानभाडे ५०–६० हजारांवर; एअरलाइन्सकडून वाढलेल्या दरांवर प्रवाशांचा संताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलेने तक्रारदारासोबत ओळख वाढवून स्वतःला उच्च न्यायालयात वकिली करत असल्याचे सांगितले. तक्रारदाराच्या पत्नीने दाखल केलेल्या खटल्यात मदत करू, असे सांगत तिने त्यांच्याशी जवळीक वाढवली.

मात्र, तिने दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला तक्रारदाराने नकार दिला. त्यानंतर तिने तक्रारदार आणि त्यांच्या आईला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. 'माझ्यासोबत लग्न न केल्यास दोन लाख रुपये दे; अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते,' अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *