Pune Crime : हॉर्न वाजवल्याने सटकली! दोघांनी कुटुंबाला केली बेदम मारहाण, महिलांनाही सोडलं नाही

Pune : पुण्यामध्ये ट्राफिकमध्ये हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने दोघांनी कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलांना देखील या तरुणांनी मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबता त्यांनी कारची देखील तोडफोड केली. या मारहाणीमध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. पुण्यातील मुंढवा भागात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

पुण्यामध्ये हॉर्न वाजवल्यामुळे आधी बापेलेकाने वाद घातला आणि नंतर फायटरने कुटुंबावर वार केले. पुण्यातील मुंढवा भागात एका परिवाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ट्रॅफिकमध्ये असताना हॉर्न का वाजवला म्हणून २ जणांनी मारहाण करत कारची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ बापलेकाला अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Palghar Politics : शिवसेनेचा राज ठाकरेंना धक्का; जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या गटात प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. मुंढवा कोरेगाव पार्क रोडवर ही घटना घडली. फिर्यादी राजेश वाघचौरे हे त्यांच्या परिवारासोबत कोरेगाव पार्कच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुंढवा -कोरेगाव पार्करोडवर एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने पुढील कारला त्यांनी हॉर्न दिला.

हॉर्न दिल्याचा राग आल्याने पुढे असलेल्या राजू गायकवाड आणि त्यांच्या मुलगा शुभम गायकवाड याने कारमधून उतरत वाघचौरे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केला. त्यानंतर त्यांच्या जवळ असलेल्या फायटरने त्यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर सोबत असलेल्या कुटुंबियांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राजेश नाथोबा वाघचौरे त्यांच्या पत्नी सुवर्णा राजेश वाघचौरे आणि मुलगी संस्कृती राजेश वाघचौरे हे तिघे ही जणं जखमी झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना अटक केली. याचा तपास पोलिस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply