Pune Crime : खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, तरुणाने जिवलग मित्रालाच संपवलं

Pune Crime :पुण्यामध्ये तरुणाने आपल्या जिवलग मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे दिले नाही याचा राग आल्याने तरुणाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याची हत्या केली. लोणी काळभोर येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर योगेश लक्ष्मण काळभोर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १५ डिसेंबरला योगेश काळभोर आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोरमधील रायवाडी परिसरात असलेल्या दत्तात्रय कांबळे याच्या खोलीत दारू पित बसले होते. त्यावेळी आरोपी नंदू त्या ठिकाणी आला. त्याने योगेशला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

Pimpari Chinchwad Crime : आळंदी हादरली! २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, खासगी शिक्षण संस्थेतील धक्कादायक प्रकार

आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाही अशी विचारणा त्याने केली. त्यानंतर त्याने धक्काबुक्की केली. त्या दोघांची तिथे झटापट झाली. यादरम्यान नंदूने योगेशच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकला. या घटनेत योगेश गंभीर जखमी झाला. योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

याप्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता या चौकशीत नंदूने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून योगेशच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन त्याची हत्या केली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी नंदू म्हात्रे याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply