Pune Crime : पुण्यात महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की, दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल

 

Pune Crime : वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला दुचाकीस्वार महिलेने धक्काबुक्की केल्याची घटना वारजे परिसरात घडली. याबाबत वारजे पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका २६ वर्षीय दुचाकीस्वार महिलेविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी वारजे परिसरातील चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी त्यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वार महिलेस जाब विचारला. त्यावर दुचाकीस्वार महिलेने कर्मचारी आणि त्यांच्या सहकारी महिला पोलीस यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर दुचाकीस्वार महिला पसार झाली.

Pune Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमन करत असताना पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी एका दुचाकीस्वार महिलेचा वाहतूक नियम भंग केल्यामुळे तिला अडवले. महिला विरुद्ध दिशेने चालली होती, त्यामुळे पोलीस शिपाई तांबे यांनी तिला थांबवून कारवाई केली.

दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस शिपाई तांबे यांना कारवाई करताना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तांबे यांनी सहकारी महिला पोलीस शिपाई चव्हाण यांना माहिती दिली, तेव्हा दुचाकीस्वार महिलेने दोन्ही पोलीस महिलांना पुन्हा शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. झटापटीत महिला पळून गेली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply