Pune Crime : धक्कादायक! शरीरयष्टी वाढवण्यासाठी इंजेक्शनचा डोस, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

 

Pune Crime : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगली होईल, असे आमिष दाखवून उत्तेजक इंजेक्शन विकले जात होते. या प्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणात दीपक वाडेकर (वय ३२, रा. खडकी) व साजन जाधव (२५ , रा.औंध ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तेजस चोपडे यांनी तक्रार दिली आहे. आरोपी हे न.ता.वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमध्ये सदरील इंजेक्शन्स घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जिवाला धोका होऊ शकतो, हे माहिती असतानाही संबंधित औषधे विकत होते. त्यांनी संबंधित इंजेक्शन कुठुन आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदीर कोण आहेत याबाबत अजूनही अधिक तपास सुरु आहे.

सदर आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असताना देखील संबंधित औषधे अवैधरित्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्य उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याचे दिसून आले आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply