Pune Crime : पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुण्यामध्ये कोयत्याची दहशत कायम आहे. पुण्यात कोयता गँगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये आता एका डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या वाघोलीमध्ये डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. विवेक गुप्ता असं या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरकडून तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टरने आपल्या दोन साथीदारांसोबत तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रितेश बाफना हा तरुण जखमी झाला. या डॉक्टरचे पुण्यामध्ये जीवन रक्षक नावाचे हॉस्पिटल आहे.

Nashik Crime : नाशिक हादरले! घरात घुसून १८ वर्षीय तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही कळालंही नाही

डॉ. विवेक गुप्ताने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रितेश बाफनाच्या कारवर दगड मारून तोडफोड केली. लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला जखमी केले. तसंच, डॉक्टरने प्रितेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांना देखील शिवीगाळ केली होती. दरम्यान, 'डॉक्टर विवेक गुप्ता हा व्याजाचा धंदा करतो. व्याजाच्या पैशांची वसुली करण्यासाठी डॉक्टरने गुंडांना कामाला ठेवले आहे.' असा आरोप फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply