Pune Crime : पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेल ताब्यात, परदेशातील कनेक्शन उघड

Pune Crime : पुणे पोलिसांनी शहरात हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुण्याच्या विमाननगर भागात ही कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजास्थानी अभिनेत्री आणि २ मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेने विमाननगर भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

Pune Accident : पुण्यातील कात्रज परिसरात विचित्र अपघात, कारचालकाने ४ ते ५ दुचाकींना उडवलं;

विदेशात वेश्या व्यवसायाचा मास्टरमाईंड

विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात यायचा. या ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी अभिनेत्री आणि दोन रशियन मॉडेल पुण्यात आल्या होत्या. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचला.

पोलिसांनी शिताफीने एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशिय मॉडेलला वेश्या व्यवसाय करताना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर हा हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय विदेशातून चालवण्यात येत होता, हे उघड झालं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply