
पुणे : सिंहगड रस्त्यावर शनिवारी रात्री झालेल्या विजय ढुमे खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. ढुमेच्या खून प्रकरणी सिंहगड पोलिसांनी त्याच्या प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने ढुमेचा त्याच्या प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे.
सुजाता समीर ढमाल (रा. किरकटवाडी), संदीप दशरथ तुपे (वय २३, रा. राहू, इंदापूर), सागर संजय तुपसुंदर (वय १९ रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (२८, उंड्री पिसोळी) आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. क्वालिटी इन लॉजच्या परिसरात विजय ढुमे (वय ४४, रा. चिंचवड गाव) याचा सळईचे घाव घालून खून करण्यात आला होता.
|
Mumbai News : गुजराती व्यक्तीने बळकवला मराठी महिलेचा गाळा, मनसे पदाधिकारी मदतीला धावले |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याच्या तपासासाठी सिंहगड पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. संशयित आरोपींचा ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत माग काढण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. तसेच ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता हिच्याकडे देखील तपास करण्यात आला. तपासात तिने नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे याच्याबरोबर ढुमेचा खून करण्याचा कट रचल्याचे उघड झाले. त्यानंतर इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. संदीप तुपे याच्यावर टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलिस फौजदार आबा उतेकर, सतीश नागूल, सुनील चिखले, हवालदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कांडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर आणि दक्ष पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सोमवारी (ता.२) आरोपींना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
१३ वर्षापासून ढुमेचे सुजाताबरोबर प्रेमसंबंध
लाईन बॉय असलेल्या ढुमे याचे पोलिस दलात तसेच शहरातील अनेक गुन्हेगारांशी जवळीक होती. गेल्या १३ वर्षापासून ढुमेचे सुजाताबरोबर प्रेमसंबंध होते. तिचे लग्न झाले आहे. सुजाताला बाउन्सरची नोकरी करायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. चार महिन्यापूर्वी तिचे तुपेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वारंवार होत असलेला त्रास आणि नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सुजाताने नवीन प्रियकर तुपे याच्यासोबत ढुमेच्या खुनाचा कट रचला.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

