Pune : दर्शना पवार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! पोस्ट मार्टममधून खळबळजनक माहिती समोर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला असल्याचा निष्पन्न झालं आहे. समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दर्शना पवार या तरुणीच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळुन आल्या आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

दर्शना पवार असं या तरुणीचं नाव असून राहुल हांडोरे, असं तिच्यासोबत ट्रेकिंगला गेलेल्या मित्राचं नाव आहे. हा मित्र सध्या फरार आहे. सोबत गेलेल्या मित्रानेच तिची हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. CCTV फुटेज पाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply