Pune Crime : कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. तरुण हातात धारदार शस्त्रे (कोयता) घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. तसेच याशिवाय चोरटे धारदार शस्त्रे दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धमकावतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दरम्यान या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये आली आहे. बेकायदेशीर रित्या कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना सापळा रचून पोलिसांनी केली अटक केली आहे. 

मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीर रित्या कोयते बाळगल्याप्रकरणी २ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ कोयते जप्त करण्यात आले असून मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले. 

याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा (३५), गणेशसिंग हुमनसिंग टाक (३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून १८ कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत. 

पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता पोलीस विभाग बक्षीसांची खैरात करतील. पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून  कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. 

बक्षीसाचे स्वरुप...

  • शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार दहा हजार रुपये

  • शस्त्र अधिनियम कलम ४,२५ नुसार तीन हजार रुपये

  • फरारी आरोपीस पकडणे १० नुसार हजार रुपये

  • पाहीजे आरोपीस पकडणे ५ हजार रुपये

  • मोक्कातील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

  • एमपीडीएतील आरोपी पकडणे ५ हजार रुपये



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply