Pune Crime : दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस हवालदारावर गुन्हा

पुणे : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. मोहन मल्हारी ठोंबरे असे त्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ते वालचंद नगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

त्यांनी एका तक्रारीबाबत प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत एका ३४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस हवालदार ठोंबरे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याच्याविरोधात वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *