Pune : पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर पोहोचले

Pune : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुणे शहर आणि परिसरात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून, सकाळपासूनच हुडहुडी भरवणारा गारठा जाणवत आहे. निरभ्र आकाश, कोरडे वातावरण आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे शहरातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा घसरला आहे.

पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर मात्र किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहर आणि परिसरात शनिवारी (ता. १३) पाषाण परिसरात सर्वात कमी ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.पुणे शहराचे सरासरी किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. परिणामी पहाटे आणि रात्री गारठा अधिक जाणवत असून, उपनगरांमध्ये थंडीची तीव्रता तुलनेने जास्त आहे.

Ahilyanagar : मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाला हायकोर्टाचा ब्रेक; शनि मंदिराचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे. मात्र त्यानंतर पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित वाढ होणार आहे.पुणे आणि परिसरामध्ये रविवारी (ता. १४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून, तापमान नऊ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.

आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे, तर मंगळवारपासून (ता. १६) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *