Pune CNG Price Hike : वाहनधारकांना महागाईचा झटका; सलग दुसऱ्या दिवशी CNG दरात वाढ, जाणून घ्या नवी किंमत

Pune CNG Price Hike news : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. सीएनजीच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्यातील पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी सीएनजी दरात वाढ झाली. पुण्यात सीएनजी दरात एकूण ५० पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीसाठी पुणेकरांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीच्या दरात ५० पैशांनी वाढ झाली. सीएनजीचे नवे दर आज शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होतील. नव्या दरानुसार सीएनजी प्रतिकिलो ९२ रुपयांना मिळणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीचे दर वाढल्याने वाहनधारकांना मोठा दणका बसला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सीएनजी दरात वाढ झाली होती.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ७५ पैशांनी वाढ झाली होती. त्यामुळे नाशिकमध्ये सीएनजीचा दर ९१.९० रुपयांवरून ९२.६५ रुपये झाला होता. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने नाशिककरांच्या खिशाला कात्री बसली.

काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ एप्रिल रोजी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली. मुंबईत सीएनजीचा दर ७९.५० पैसे इतका झाला. एकंदरित सीएनजी प्रति किलो १.५० रुपयांनी महागला. पीएनजी गॅस १ रुपयांनी महागला. आता पीएनजीसाठी प्रति युनिट ४९ रुपये मोजावे लागणार आहे.

मुंबईत मागील सहा महिन्यात चौथ्यांदा सीएनजी दरात वाढ झाली. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दोनदा सीएनजी दरात वाढ झाली. तर एकदा डिसेंबर तर चौथ्यांदा एप्रिलमध्ये दरवाढ झाली होती. सीएनजी दरवाढ होण्याआधी ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढले होते. ऑईल आणि गॅसच्या किमती वाढल्याने दरात वाढ करण्यात आली होती .

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply