Pune City Transport : पुणे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मिरवणुकीने येत असतात. या कालावधीत रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय (फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका) परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी आरटीओ चौकातून जहांगीर हॉस्पिटलच्या दिशेने जाणार्‍या मार्गाचा वापर करावा. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी किराड चौकातून नेहरू मेमोरियल मार्गे जावे. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहनचालकांनी कमला नेहरु हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छित स्थळी जावे. बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जावे.

वाहतुकीतील हा बदल गुरुवारी (ता.१३) सकाळी सहा ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरता अंमलात राहणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply