Lonavala Accident : खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दाेघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Lonavala Accident : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दाेघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनूसार पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.
 
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला.
 

Pune Car Accident : फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

ही कार अलिबाग वरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी आणि भूमिका चौधरी हे सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply