Pune Car Accident : फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

Pune Car Accident :  पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवत दोघांना चिरडलं. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण, गुन्हा दाखल होताच अग्रवाल फरार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्यांना छत्रपती संभाजीनगर  शहरातून अटक केली.

विशाल अग्रवाल यांना आज दुपारपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाईल. यावेळी न्यायालय विशाल अग्रवाल यांना काय शिक्षा सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीनमुलाने दारुच्या नशेत सुसाट कार चालवत दुचाकीस्वारांना उडवलं होतं. या अपघातात अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया, या दोघांचा जागीच मृत्यू झाला. परवाना नसतानाही अग्रवाल यांनी अल्पवयीन मुलाच्या हातात कार कशी दिली? असा सवाल अनेकांनी केला.

अपघातानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर कोर्टाने १५ तासांतच त्याची सुटका केली. मात्र, अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होते. पोलिसांचा त्यांच्यासोबत संपर्क होत नव्हता. ते पसार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातल्या एका लॉजमधून विशाल अग्रवालला पकडण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्य इतर दोघांना छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलीस पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

विशाल अग्रवाल हा कारने छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये रात्री आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील एका छोट्या लॉज मध्ये तो थांबला होता. त्याच्यासोबत असल्या कारचा ड्रायव्हर आणखी दुसरा एक जण दुसऱ्या लॉजमध्ये थांबले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply