Pune Cantonment Board : पुणे महापालिकेत कॅन्टोन्मेंट बोर्ड समावेश करण्याचा निर्णय

पुणे - खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी संबंधित बोर्डासंबंधीची अद्ययावत माहितीचा अहवाल राज्य सरकारने महापालिकेकडे मागविला होता. मात्र आत्तापर्यंत तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड संबंधिचा माहितीचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आलेला नाही.

राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यांच्या जवळील महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. त्याबाबत अन्य महापालिकांसमवेतच पुणे महापालिकेलाही राज्य सरकारने त्यांच्या येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबतची अद्ययावत माहितीचा अहवाल मागविला होता. पुण्यात खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार लष्कराच्या देखरेखीखाली आत्तापर्यंत सुरु आहे. मागील काही वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणुक झालेली नाही.

नागरी भागातील एक प्रतिनिधी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नागरीकांचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवडणुक घ्यावी, असा आग्रह स्थानिक नागरीकांकडून केला जात होता. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी निवडणुका देखील जाहीर झाल्या होत्या, मात्र या निवडणुका तत्काळ रद्द करण्यात आल्या होत्या.

या घडामोडीनंतर संरक्षण विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यांना संबंधित बोर्ड स्थानिक महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची माहिती मागविली होती. त्याच पद्धतीने राज्य सरकारने देखील महापालिकांकडे याबाबतची माहिती मागविली होती. राज्य सरकारने पुणे महापालिकेकडे पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटबाबतची माहिती मागविली होती. परंतु, अद्याप त्यासंबंधीची माहिती राज्य सरकारकडे पाठविण्यात आली नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply