Pune Cantonment Board : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रात्री बारानंतर टोल वसुली बंद, नागरिकांकडून स्वागत

Pune Cantonment Board  - पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली बंद करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून अखेर बोर्डाला गॅझेटच्या स्वरूपात आदेश देण्यात आले आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२ वा. नंतर वसुली बंद करण्याचे आदेश बोर्डाकडून वसुली केंद्राला देण्यात आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील (वेहिकल एन्ट्री टॅक्स) वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार हे साधन बंद झाल्याने बोर्डाच्या उत्पन्नात घट जरी झालेली असली तरी, मात्र यानिर्णयाचे स्वागत नागरिकांनी केले आहे.

बोर्डाची आर्थिक परिस्थिती एकीकडे ढासळली असताना जीएसटी चा वाटा मिळण्यासाठी बोर्ड अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने बोर्डाची अवस्था अधिक बिकट झालेली आहे.

बोर्डातील महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात बोर्डातील सीईओ सुब्रत पाल यांच्याशी कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता परंतु तो होऊ शकला नाही

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply