Pune Bypoll Election: CM शिंदेंच्या शब्दाला डावलून ७३ उमेदवार रिंगणात

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्वपक्षीय नेत्यांना फोन करत आव्हान केले होते. मात्र, त्यांच्या मताला डावलत सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली उमेदवारी जाहीर केली.

कसबा आणि चिंचवडमध्ये तब्बल 73 उमेवार रिंगणात आहेत. त्यामुले संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे. यात भाजप महायुतीचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह 33 उमेदवारांनी दाखल केले असून या अर्जांची आज छाननी होणार आहे. तर चिंचवडच्या जागेसाठी 40 उमेदवार रिंगणार आहेत.

कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. टिळक कुटुंब निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपकडून टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली.

कसबा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक अटितटीची होणार असून, टिळक कुटुंबाच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत

चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेलेल्या जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे हे उमेदवार त्यांच्याविरुद्ध आहेत.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्यानं या मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply