Pune By-Elections : घराणेशाही की इतरांना संधी; मुक्ता टिळकांनंतर कसब्याचं सिंहासन कोणाकडे?

पुणे : भाजपाचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातल्या दोन मतदारसंघातल्या जागा रिक्त झाल्या आहेत. याच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये कसब्यासाठी आता भाजपा कोणाला संधी देणार की इतर पक्षांचा उमेदवार बाजी मारणार, याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.

कसबा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडेच आहे. सध्या खासदार असलेले गिरीश बापट याआधी पाचवेळा याच मतदारसंघातून निवडून आले आहे. त्यांच्यानंतर मुक्ता टिळकांना संधी मिळाली. आत्तापर्यंत हा मतदारसंघ त्यांच्याच ताब्यात होता. पण आता त्यांच्या निधनानंतर नव्या नावांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

कोणती आहेत ही नावं?

1. धीरज घाटे

धीरज घाटे हे माजी नगरसेवक असून सभागृह नेता म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. तसंच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. कसब्यासाठी सध्या त्यांचं नाव चर्चिलं जात आहे.

2. गणेश बीडकर

बीडकर यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते, तसंच सभागृह नेतेही होते. हेही फडणवीसांच्या जवळचे मानले जातात.

3. हेमंत रासने

रासने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. ते दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. तेही या स्पर्धेत आहेत.

4. शैलेश किंवा कुणाल टिळक

नव्याने लोकांना उभं करण्यापेक्षा भाजपा टिळक घराण्यापैकीच कोणाला तरी उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊ शकतं. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल आणि पती शैलेश यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र अद्याप टिळक कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply