Pune By-Election : महाविकास आघाडीत मतभेद? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची उडी

Pune By-Election  : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र या जागेवरून संघर्ष होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

भाजपकडून (BJP) माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह गणेश बिडकर आणि शैलेश टिळक यांचे नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात जोरदार राजकारण रंगलं आहे.

तर, दुसरीकडे आता कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना  उतरणार आहे. पुण्यात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीत पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. कालच्या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होत हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply